“व्यक्तीला नव्हे तर भ्रष्ट व्यवस्थेला विरोध”
हे घोषवाक्य घेऊन लोकशिक्षण आणि लोकजागृतीच्या उद्देशाने स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करण्यात आली आहे. परिषदेचे कामकाज संपुर्ण भारत देशामध्ये चालणार आहे. समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर ढासळत चालला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. शासन आणि प्रशासन दोन्ही भरकटले असल्याचे अनेकदा स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची सर्रास लुट होत आहे. जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे समाजहितासाठी स्वार्थ बाजुला ठेवुन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र करून देशहितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करण्यात आली आहे. प्रशासनाला प्रश्न विचारणारे सजग नागरीक तयार करून आपल्याला लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रूजवायची आहेत. तमाम जनतेला आवाहन करण्यात येते की, या चळवळीत चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. देशहितासाठी काम करावे.